sujay vikhe and nagar politics | Sarkarnama

नगरमधील महापौर निवडीत कॉंग्रेसचा निर्णय डॉ. सुजय विखे घेणार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 डिसेंबर 2018

नगर : महापालिकेच्या निवडणुकीत 68 पैकी कॉंग्रेसचे केवळ पाच नगरसेवक निवडून आले. त्यांचा स्वतंत्र गट नोंदविला असून, महापौर निवडीत कोणाला मदत करायची, हे सर्वस्वी डॉ. सुजय विखे यांच्याकडे सोपविले आहे. आज लोणी येथे झालेल्या बैठकीत वेट ऍण्ड वॉच ची भूमिका घेण्याचा निर्णय झाला असल्याचे समजते. महापालिका त्रिशंकू झाल्याने कोणत्याही दोन पक्षांना एकमेकांची गरज पडणार आहे. त्यामुळे महापौर निवडीच्या या महाभारतात कॉग्रेसच्या या पाच पांडवांनी कोणाच्या पारड्यात मत टाकायचे, हे त्यांचे सारथ्य करणारे डॉ. विखेच ठरविणार आहेत. 

महापालिकेत विजयी झालेल्या रुपाली वारे, संध्या पवार, रिझवाना शेख, शीला चव्हाण व सुप्रिया जाधव यांच्यावतीने त्यांच्या पतीराजांनी आज डॉ. सुजय विखे यांची भेट घेवून चर्चा केली. निखिल वारे, बाळासाहेब पवार, फारुख शेख, दीप चव्हाण व धनंजय जाधव यांनी केलेली ही चर्चा आधी गुप्त ठेवण्यात आली होती. महापौर निवडणुकीत कोणाला साथ द्यायची, याबाबत ही चर्चा झाली. शिवसेना व भाजपची युती झाल्यास आपल्याला त्याचा काय फायदा होऊ शकतो, किंवा ऐनवेळी राष्ट्रवादी व भाजपची युती झाल्यास आपल्या वाट्याला कोणते पद मिळू शकेल, याबाबत खल झाल्याचे समजते. 

पक्षाची म्हणून काय भूमिका घ्यायची, याबाबत पाचही जणांचे मत आजमावून डॉ. विखे यांच्यावर हा निर्णय सोपविण्यात आला आहे. अजून चार दिवस शिल्लक असल्याने डॉ. विखे परिस्थिती पाहून निर्णय सांगतील, असे समजते. दरम्यान, आगामी लोकसभेसाठी डॉ. विखे उमेदवारी करणार असल्याने महापालिकेत कोणाला न दुखविता तटस्थ भूमिका घ्यायची, असे धोरण डॉ. विखे घेणार असल्याचे समजते. 

विकासाबरोबर जाणार : जाधव 
महापौर निवडीत आम्ही कोणाला साथ द्यायची याबाबत आज लोणी येथील बैठकित चर्चा झाली. विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे आमच्या प्रभागात जो पक्ष विकासाची शास्वती देईल, त्यांच्याच सोबत आम्ही जाणार आहोत. परंतु नेमका भूमिका काय घ्यायची, ते डॉ. सुजय विखे ठरवितील. सर्व अधिकार त्यांना आहेत, असे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी सरकारनामा शी बोलताना सांगितले. 

संबंधित लेख