Sudhir Mungantiwar Being Targeted within the Party | Sarkarnama

'अवनी' प्रकरणात स्वकीयांकडूनच मुनगंटीवार 'टार्गेट'?

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

गेल्या महिन्यात पांढरकवडा जंगलात अवनी वाघीणीला ठार करण्यात आले. यावरून सुरू झालेला वाद अद्यापही शांत झाला नाही. चंद्रकांत दादा पाटील यांच्यानंतर मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार यांचे स्थान आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही शिवसेनेच्या मंत्र्यांनी अवनीवरून मुनगंटीवार यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. यामागेही भाजपातील काही नेत्यांची शिवसेनेच्या मंत्र्यांना फूस असल्याचे बोलले जात आहे.

नागपूर : अवनी वाघिणला ठार करण्यावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना घेरण्यामागे भाजपातील काही लोक असल्याचे सूचक वक्तव्य खुद्द मुनगंटीवार यांनी केले आहे. त्यांचा इशारा कुणाकडे आहे? याबद्दल आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या महिन्यात पांढरकवडा जंगलात अवनी वाघीणीला ठार करण्यात आले. यावरून सुरू झालेला वाद अद्यापही शांत झाला नाही. चंद्रकांत दादा पाटील यांच्यानंतर मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार यांचे स्थान आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही शिवसेनेच्या मंत्र्यांनी अवनीवरून मुनगंटीवार यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. यामागेही भाजपातील काही नेत्यांची शिवसेनेच्या मंत्र्यांना फूस असल्याचे बोलले जात आहे. या मुद्यावरून भाजपच्या नेत्यांमध्ये दोन गट पडलेले आहेत. विरोधकांनीही या मुद्यावरून मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

विरोधकांच्या या मागणीला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाच असल्याचे स्पष्ट केले. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहे. राजीनामा मागण्याचा अधिकार केवळ अमित शहा यांना असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार मुनगंटीवार यांनी गौण ठरविला काय? असा प्रश्‍न विचाराला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी अवनी वाघीणी प्रकरणात योग्यप्रकारे संरक्षण दिले नसल्याची भावना मुनगंटीवार यांच्या समर्थकांमध्ये आहे. अवनी वाघीण मारण्याच्या प्रक्रियेत काही चूक झाली असल्यास चौकशी करण्यात येईल, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी दिले होते. यावरून मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवार यांची योग्यप्रकारे पाठराखण केलेली नसल्याचे बोलले जात आहे. 'पक्षातील माणूस कसा मोठा होणार नाही, हे मी आठ दिवसांपासून अनुभवत आहे', या मुनगंटीवारांच्या वक्तव्याने पक्षातील सुंदोपसुंदीचे स्पष्ट संकेत दिल्याचे बोलले जात आहे.

संबंधित लेख