sudhakar kohale bjp nagpur | Sarkarnama

आजचा वाढदिवस : सुधाकर कोहळे, आमदार, दक्षिण नागपूर, भाजप. 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 जुलै 2017

 

 

भाजपचा सामान्य कार्यकर्ता ते नागपूर शहर भाजपचे अध्यक्ष असा राजकीय प्रवास करणाऱ्या सुधाकर कोहळे यांनी थोड्याच काळामध्ये नागपूर शहरात एक राजकीय स्थान निर्माण केले आहे. भाजपमध्ये सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या कोहळे 2007 च्या महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर ते नागपूर सुधार प्रन्यासचे विश्‍वस्त म्हणूनही त्यांनी काम केले. 2012 मध्ये ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दक्षिण नागपूर विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांचा पराभव केला. काही महिन्यांनी नागपूर शहर भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. 

संबंधित लेख