subodha mohite | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

कॉंग्रेस नेते सुबोध मोहिते  शिवसंग्राममध्ये दाखल 

गोविंद तुपे ः सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 29 मे 2017

मुंबई : प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री सुबोध मोहिते यांनी शिवसंग्राममध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रसे मध्ये संधी मिळत नाही. शिवसेनेनेही परतीचे दरवाजे बंद केले आहेत. अशा परस्थितीत स्वत:चे राजकीय अस्तित्व पुन्हा नव्याने उभे कऱण्यासाठी मोहिते यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यातच शिवसंग्रामकडून मोहिते यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा दिल्यामुळे दोघांनाही याचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. 

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मोहिते हे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री होते. रामटेक लोकसभा मतदार संघातून दोन वेळा खासदार म्हणूनही ते निवडूण आले होते. विदर्भातील मोठा जनाधार असलेला मराठा समाजाचा अभ्यासू नेता अशी त्यांची ओळख आहे. सध्याच्या राजकीय परस्थितीत कॉंग्रेसमध्ये काम करण्यास संधी मिळत नसल्याने मोहिते यांनी शिवसंग्रामचा पर्याय निवडला असल्याचे बोलले जात आहे. 

विशेष म्हणजे मोहिते यांच्या प्रवेशामुळे शिवसंग्रामपक्षाला विदर्भात मोठी ताकद मिळणार असल्याचे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर मोहिते यांचा मिहान, वीज, उद्योग या क्षेत्रातील असलेला गाढा अभ्यास आणि जनसंपर्क याचाही मोठा फायदा पक्षाला होणार असल्याचेही ते म्हणाले. तर नागपूर येथील कटोल विधानसभा मतदार संघाची बांधणी मोहिते यांनी सुरू केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 
 
संबंधित लेख