Subodh savji wants Ram Kadam's tongue cut | Sarkarnama

राम कदमांची जीभ छाटण्याऱ्यास  सुबोध सावजीकडून पाच लाख बक्षीस जाहीर 

अरूण जैन
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

वादग्रस्त वक्तव्य  आणि  आंदोलनांच्या माध्यमातून सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहणारे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी आणखी एक बक्षीस जाहीर केले आहे.

बुलडाणा : वादग्रस्त वक्तव्य  आणि  आंदोलनांच्या माध्यमातून सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहणारे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी आणखी एक बक्षीस जाहीर केले आहे. मुलींबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या भाजप आमदार राम कदम यांची जीभ छाटून आणा व पाच लाख रूपये घेऊन जा अशी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे असा व्हिडीओसुद्धा स्वतःच व्हायरल करविला आहे.

<iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebo..." width="560" height="308" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allowFullScreen="true"></iframe>

सुबोध सावजी म्हणजे बुलडाणा जिल्ह्यातील अफलातून व्यक्तीमत्व. विहीरीत बसून आंदोलन, अधिका-याचा खून करण्याची धमकी देवून आंदोलन, श्राद्ध आंदोलन अशा वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सावजींना हौस आहे. हाही त्यातलाच भाग असो.जानेवारी महिन्यात त्यांनी  विहिरीत बसून केलेल्या अनोख्या आंदोलनाने  राज्याचे लक्ष्य वेधून घेतलेले होते. जिह्यातील नळपाणीपुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला होता .

सदर व्हीडीओमध्ये सावजींनी म्हटले आहे," की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. महाराजांनी सातत्याने महिलांचा सन्मानच केला आहे. मराठा समाजात जन्माला येऊन राम कदम यांनी मुली पळविण्याची भाषा शोभत नाही. यामुळे भाजपचेही नाव खराब होत आहे.  आपण चांगल्या सुसंस्कृत पक्षात असूनही कु-कर्मी आहात " असेही सावजींनी म्हटले आहे.

संबंधित लेख