subhash jagtap clears his stand on acb charsheet | Sarkarnama

`दूध का दूध` केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : सुभाष जगताप

उमेश घोंगडे
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. चुकीच्या माहितीच्या आधारे माझ्या घरावर टाकलेल्या छाप्यात कोणत्याही प्रकारची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली नाही. "एसीबी'ने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपबत्रातदेखील हे मान्य केल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महापालिकेतील माजी सभागृह नेते विद्यमान नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला आहे. 

पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. चुकीच्या माहितीच्या आधारे माझ्या घरावर टाकलेल्या छाप्यात कोणत्याही प्रकारची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली नाही. "एसीबी'ने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपबत्रातदेखील हे मान्य केल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महापालिकेतील माजी सभागृह नेते विद्यमान नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला आहे. 

"एसीबी'ने गेल्या आठवड्यात जगताप यांना याप्रकरणी अटक केली होती. मात्र त्याच दिवशी जामीनावर जगताप यांची सुटका झाली होती. या संदर्भातील माहिती सांगण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जगताप यांनी हा दावा केला आहे. या संदर्भात बोलताना जगताप यांनी या प्रकरणात राजकारण आल्याचा आरोप केला आहे.

ते म्हणाले, "माझ्यावर करण्यात आलेली कारवाई राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली. दाखल करण्यात आलेला गुन्हादेखील राजकीय सूडबुद्धीने करण्यात आला आहे. दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. माहिती आधिकार कार्यकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीवर चौकशी करून क्‍लिन चीट दिलेली असताना राजकीय सूडबुध्दीने माझ्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये कोणत्याही प्रकारची बेहिशेबी मालमत्ता आढळली नाही. तरीही माझ्यावर राजकीय द्वेषातून गुन्हा दाखल करण्यात आला. परंतू, मी सत्य बाहेर काढून `दूध का दूध` केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे विरोधकांनी लक्षात घ्यावे.``

जगताप म्हणाले, "" एका विरोधकाने "एसीबी'कडे तक्रार अर्ज केला होता. त्यानुसार सन 1992 ते 31 डिसेंबर 13 अखेर माझी गुप्त व उघड चौकशी चालू होती. तक्रारीमध्ये काहीही तथ्य नसल्याने दि. 31 जुलै 2014 रोजी चौकशी बंद करुन त्यांना क्‍लिन चिट देण्यात आली होती. यानंतर एका माहिती आधिकार कार्यकर्त्याने 30 सप्टेंबर 2014 रोजी यांनी पुन्हा माझ्या विरुध्द 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या मालमत्तेच्या प्रतिज्ञापत्रामध्ये 15 गुंठे जागेची माहिती माहिती दिली नाही, अशी तक्रार "एसीबी' कार्यालयात केली होती. या संदर्भातील तक्रारकर्त्याने भागिदारीपत्रे व इतर कागदपत्रे बनावट व खोटी सादर केल्याचे "एसीबी' कार्यालयाने मान्य केले आहे. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रामध्येदेखील याचा कोठेही उल्लेख केलेला नाही.''
 

संबंधित लेख