subhash deshmukha, hami bhav | Sarkarnama

उडीद-मुगाला देणार हमीभाव : सुभाष देशमुख 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

मुंबई : शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी उडीद आणि मुगाची खरेदी शासन हमीभावाने करेल, यात कोणत्याही शेतकऱ्यांना अडचण येणार नसून त्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

राज्यात या वर्षी उडीद व मुगाचे चांगले उत्पन्न झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळणे गरजेचे आहे. उडीद व मुग खरेदी केंद्रे सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, शेतकऱ्यांनी कमी दरात उडीद आणि मुग बाजारात विक्री करण्याची घाई करू नये, शासन त्यांना हमीभाव मिळवून देईल असेही देशमुख यांनी सांगितले. 

ज्या शेतकऱ्यांना तातडीने पैशांची गरज आहे अशा शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल विक्री न करता शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन नये म्हणून राज्यभर लवकरच खरेदी केंद्रे उभारली जातील. या केंद्रांवर हमी भावाने शेतकऱ्यांचे उडीद व मुग खरेदी केले जातील. एखादा व्यापारी कमी दरात शेतकऱ्यांचा माल खरेदी करत असेल तर ती बाब शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी. शासन अशा व्यापाऱ्यांवर ठोस कारवाई करेल. आपला माल कमी दरात न विकता योग्य दरात विकावा असे आवाहनही देशमुख यांनी केले. 

संबंधित लेख