आजचा वाढदिवस : सुभाष देशमुख - सहकारमंत्री 

आजचा वाढदिवस : सुभाष देशमुख - सहकारमंत्री 

एकेकाळी ठेकेदारी करणाऱ्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना भाजपने 1998 साली विधान परिषदेची उमेदवारी दिली. सोलापूर
स्थानिक स्वराज्य संस्थेमधून ही उमेदवारी देण्यात आली. सोलापुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व होते. या दोघांच्या तुलनेत भाजपची ताकद खूपच नगण्य होती. असे असतानाही सहकारमंत्री देशमुख यांनी विजय मिळवून राजकारणात प्रवेश केला. कोणताही राजकीय वारसा नसताना देशमुख यांनी मिळविलेला हा विषय त्यांना खूपच नावलौकिक देऊन गेला. 

2000 साली ते भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले. त्यानंतर 2004 साली त्यांना पक्षाने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.
त्यांच्या समोर तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्वला या कॉंग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यावेळी देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा पराभव केला. त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी देशमुख यांना माढा मतदारसंघातून थेट शरद पवार यांच्या विरोधातच पक्षाने रिंगणात उतरविले. त्यावेळी केंद्रीयमंत्री असणाऱ्या पवारांच्या विरोधात देशमुखांची डाळ शिजली नाही. त्याच साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. आमदार मधुकर चव्हाण यांनी श्री. देशमुख यांचा पराभव केला. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सहकारमंत्री देशमुख यांना सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसचे तत्कालीन आमदार दिलीप माने यांचा पराभव केला होता. 2014 ला ते भाजपचे प्रदेश उपाध्यक्षही होते. सात जुलै 2016 ला कॅबिनेटमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. लोकसभेसाठी माढ्यातून त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे. सहकारमंत्री म्हणून काम करताना त्यांनी वेगळा ठसा सहकार क्षेत्रामध्ये उमटविला आहे. बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदान करण्याचा अधिकार देण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com