subhash deshmukh appeals sadashivrao patil | Sarkarnama

सदाभाऊंना भाजपात आणलंय, हे मला मुख्यमंत्र्यांना सांगायचयं! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

आम्हाला जिंकणारी माणसे पाहिजेत. नुसतीच लढणारी नको आहेत.

-सुभाष देशमुख, पालकमंत्री 

सांगली : खानापूरमधील कॉंग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. यापार्श्‍वभूमीवर पालकंमत्री सुभाष देशमुख यांनी विट्यातील कार्यक्रमात त्यांना भाजपप्रवेश लवकरात लवकर करण्याचे आवाहन केले. 

विट्यातील पाणीयोजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार सदाशिवराव पाटील, ऍड. वैभव पाटील यांना उद्देशून पालकमंत्री देशमुख म्हणाले, सांगली जिल्ह्याने भाजपला 4 आमदार दिले. जिल्हा परिषद दिली. महानगरपालिकेतही विजय मिळाला. आता विटा नगरपालिकाही भाजपच्या विचारांची झाली पाहिजे.आम्हाला जिंकणारी माणसे पाहिजेत. त्यामुळे दोघे लवकरात लवकर भाजपमध्ये या, तसेच तिकीट खेचून घ्या. सदाभाऊंना भाजपमध्ये आणलंय, हे मला मुख्यमंत्र्यांना सांगायचय, असेही देशमुख म्हणाले. 

या कार्यक्रमात भाजपचे ऑनलाइन सदस्य होण्यासाठी मिस कॉल देण्याचे आवाहन देशमुख यांनी केले होते. त्यानुसार काही कार्यकर्त्यानी मिसकॉल दिले. त्यावर देशमुख यांनी कार्यक़र्त्यांनी प्रवेश केला आहे, आता तुम्हीही करा असे सांगितले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख