subhash deshmukh about bjp ticket in madha | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

'माढ्या'चा निर्णय मोदी-अमित शाह घेणार!  

संपत मोरे, पुणे
गुरुवार, 14 मार्च 2019

मी सामान्य कार्यकर्ता आहे.

"मी पार्टीचा सामान्य कार्यकर्ता आहे. माढा मतदारसंघातून पक्षाने कोणीही उमेदवार दिला तरी त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहून निवडून आणायची जबाबदारी आमची आहे" असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

"मी कधीही लढणार आहे असं म्हणत नसतो आणि लढणार नाही असंही म्हणत नसतो. पक्ष देईल तो आदेश मी पाळत असतो" असे सांगून देशमुख म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे माढा मतदारसंघाच्या उमेदवारीचा निर्णय घेणार आहेत. ते जो आदेश देतील तो मला मान्य आहे आणि जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला विजयी करणे ही माझी जबाबदारी आहे."

माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत देशमुख म्हणाले,"मला त्याबाबत काहीही माहिती नाही. याबाबतच्या बातम्या मी वृत्तपत्रातून वाचतोय. जर तसं काही असेल तर त्याचा निर्णय वरीष्ठ नेते घेतील. मी सामान्य कार्यकर्ता आहे."
 

संबंधित लेख