subhash desai, suggetion to officer, mumbai | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

फेरीवाल्यांच्या मुजोरपणा थांबवा  सुभाष देसाईंची अधिकाऱ्यांना तंबी 

सुचिता रहाटे 
बुधवार, 28 जून 2017

मुंबई : बोरिवली-मागाठणे परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या फेरीवाल्यांमुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळा सुरू झाल्याने त्यात आणखी भर पडली आहे. फेरीवाल्यांच्या या मुजोरपणासह अन्य मुद्यांवर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज मंत्रालयात मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

मुंबई : बोरिवली-मागाठणे परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या फेरीवाल्यांमुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळा सुरू झाल्याने त्यात आणखी भर पडली आहे. फेरीवाल्यांच्या या मुजोरपणासह अन्य मुद्यांवर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज मंत्रालयात मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

मुंबईत पावसाळा सुरू झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबत आहे. महानगरपालिका शिवसेनेकडे असून अर्थातच सगळी जबाबदारी याच पक्षाकडे येते. मुंबईकरांच्या प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. बोरिवली-मागाठणे सह अनेक तक्रारी आमच्या पर्यंत पोहचत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी आज मनपा व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे सुभाष देसाई यांनी 'सरकारनामा' शी बोलताना सांगितले. 

बोरिवली मागाठणे परिसरात मोठया प्रमाणात फेरीवाले असल्याने स्थानिक नागरीकांची खूप अडचण होत आहे. फेरीवाल्यांनी फेकलेल्या कचऱ्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने सगळीकडे चिखल पसरला असून नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी फेरीवाल्यांच्या मुजोरी संदर्भात सुभाष देसाई यांना माहिती दिली होती. त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा आग्रह केला होता. या पार्श्वभूमीवर देसाई यांनी सदर भागातील फेरीवाल्यांना हटविण्याची तंबी मनपा अधिकाऱ्यांना दिली.  
 

संबंधित लेख