subhash bambare - state defence minister | Sarkarnama

आजचा वाढदिवस : सुभाष भामरे, संरक्षण राज्यमंत्री.

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

 लोकसभेच्या धुळे मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या रूपाने मतदारसंघाला प्रथमच मंत्रिपद मिळाले. विख्यात कर्करोग तज्ञ व
शल्यचिकित्सक, पक्षविरहित व्यक्तिमत्त्व, मितभाषी, अभ्यासू अशा डॉ. भामरे यांच्या
जमेच्या बाजू आहेत. शिवसेनेकडून 2004 मध्ये धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची
निवडणूक लढताना ते पाच हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले. मात्र 2014 च्या
लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेतून ते भाजपमध्ये दाखल झाले आणि विजयानंतर
मंत्रिपदही मिळाले. देशाची बाजू मांडण्यासाठी त्यांनी विदेशातील अनेक महत्त्वाच्या

परिषदांना हजेरी लावली. आजोबा (कै.) सीताराम पाटील हे सत्यशोधक चळवळीतील, वडील (कै.) रामराव पाटील हे कम्युनिस्ट आणि कॉंग्रेसशी जोडलेले, आई (कै.) गोजरताई या 1972 ते 1978 या कालावधीत साक्री मतदारसंघातील कॉंग्रेसच्या आमदार राहिल्याने समृद्ध राजकीय वारसा डॉ. भामरे यांच्या पाठीशी आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याने वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

संबंधित लेख