students stop mp supriya sule`s convoy | Sarkarnama

विद्यार्थिनींनी अडविला खासदार सुप्रिया सुळे यांचा ताफा

शौकत तांबोळी
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

नीरा नरसिंहपूर : ताई, इंदापूर आगाराच्या मोडक्या, खराब, बंदपडक्या एसटी बसमुळे आम्हाला शाळेत जायला उशीर होतो. अनेकदा तर एसटी न आल्याने शाळा बुडते त्यामुळे तुम्ही लक्ष देवून सुधारणा करावी, अशी मागणी शालेय विद्यार्थ्यीनीनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार केली. 

नीरा नरसिंहपूर : ताई, इंदापूर आगाराच्या मोडक्या, खराब, बंदपडक्या एसटी बसमुळे आम्हाला शाळेत जायला उशीर होतो. अनेकदा तर एसटी न आल्याने शाळा बुडते त्यामुळे तुम्ही लक्ष देवून सुधारणा करावी, अशी मागणी शालेय विद्यार्थ्यीनीनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार केली. 

सुप्रिया सुळे या नरसिंहपूर परिसरातील गावभेट दौरावर होत्या. गणेशवाडी येथे त्यांच्या गाड्यांचा ताफा शालेय विद्यार्थ्यांनीनी अडवून सदरची तक्रार त्यांच्या कानावर घातली. त्यांच्यासमवेत आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, महारूद्र पाटील, अशोक घोगरे आदि मान्यवर उपस्थित होते.
 
प्रियंका खडागळे ही विद्यार्थिनी म्हणाली की बावडा - नरसिंहपूर राज्य मार्गावर इंदापूर आगाराची एकमेव एसटी बस आहे. परंतु मोडकळीस आलेल्या, खराब, स्क्रॅप, ब्रेकफेल होणारे एसटी बसेसमुळे आम्हाला अनेकदा शाळा बुडवावी लागली आहे. अनेकदा तर परीक्षेला वेळेत पोहोचण्यासाठी चालत जावे लागले आहे.

आठवड्यातून दोन दिवस शाळा चुकत असते असे वैष्णवी खंडागळे यांनी सांगितले. तसेच सोनाली खंडागळे, अंकिता भोसले, साक्षी कांबळे, सोनाली जाधव, मनिषा खंडागळे आदि विद्यार्थ्यीनीनी सुळे यांच्याशी बोलताना तक्रारी सांगितले.

 
खासदार सुळे म्हणाल्या, यासंदर्भात मी व भरणेमामा परिवहन मंत्र्यांना भेटून चर्चा करून प्रश्न निकाली काढतो. विद्यार्थ्यांनी याबाबत आम्हाला वेळोवेळी कळवावे असे आवाहन केले. ताई तुम्ही आमच्या काही विद्यार्थ्यीनीनी सायकल दिल्याने थोडासा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे तुमचे आमच्या व कुटुंबियांचा वतीने खूप खूप आभारी आहे. यापुढेही असाच लोभ राहावा, असेही या विद्यार्थिनींनी आवर्जून सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख