student ask vinod tawade | Sarkarnama

"तुम्ही आमचे पालक आहात, पालकांसारखे वागा" : तावडेंना विद्यार्थ्यांनी सुनावले

संपत मोरे
गुरुवार, 10 जानेवारी 2019

पुणे : अमरावती येथे व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्या एका विद्यार्थ्यांला अटक करण्याचे आदेश देणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आज पुणे येथे विजयसिंह गिड्डे निकम,शर्मिला येवले,पूजा झोळे, दयानंद शिंदे पाटील या चार विद्यार्थ्यांनी भेटून 'तुम्ही फक्त मंत्री नसून आमचे पालक आहात,पालकासारखे वागा. तुम्ही अटकेचे आदेश कसे देता,"असा सवाल विचारला.

आज मंत्री तावडे पुण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे विद्यार्थी बालचित्रवाणी येथे पोहोचले.तिथे शर्मिला येवले तावडे यांना म्हणाली ,"साहेब,तुम्ही त्या विद्यार्थ्याच्याबाबत जे वागला ते चुकीचं आहे. तुमचा आम्हाला आधार वाटला पाहिजे.तुम्ही आमचे पालक आहात. पालकांची भीती वाटायला पाहिजे. पालक जर चुकला तर त्यानी मुलांची माफी मागितली पाहिजे.झाल्या प्रकाराबाबत तुम्ही माफी मागा."

त्यावर तावडे म्हणाले की अमरावतीत जे घडलं नाही त्याची चर्चा माध्यमात सुरू आहे. मी न घडलेल्या घटनेची माफी का मागू? काही विद्यार्थी संघटनांनी माझ्याविरोधात चुकीची माहिती पसरवली आहे.

तिथे उपस्थित असलेला दयानंद शिंदे हा कार्यकर्ता आक्रमकपणे "साहेब माफी मागा,माफी मागा."अस म्हणत होता. यावेळी विद्यार्थ्यांनी अमरावतीच्या प्रकरणासोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन कळमरकर यांच्याबद्दल तक्रारी सांगितल्या. त्यावर तावडे म्हणाले,"मी त्यांच्याशी बोलतो."
 
संबंधित लेख