Stop minister"s foreign tours : Dhananjay Munde | Sarkarnama

मंत्र्यांचे परदेश दौरे, जहिरातबाजीही थांबवा

संजीव भागवत : सरकारनामा न्यूज़ ब्यूरो
बुधवार, 19 एप्रिल 2017

मुंबई : व्हिआयपी संस्कृती रोखण्यासाठी केवळ लालदिवा काढण्याचा निर्णय घेऊन चालणार नाही, तर त्यासोबतच प्रत्येक मंत्र्यांचे होणारे परदेश दौरे, त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातबाजी,स्वागत सोहले यांच्यावरही नियंत्रण आले पाहिजे तरच या व्हीआयपी संस्कृतीला आळा बसेल ,अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

व्हीआयपी संस्कृती संपवण्यासाठी मंत्र्यांचा गाडीवरील लाल दिवे काढण्याचा निर्णय यापूर्वी पंजाबमधील अमरिंदर सरकारने घेतला होता. त्याचे अनुकरण संपूर्ण देशभर करण्याचा हा निर्णय स्वागतार्ह  असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. मात्र केवळ दिवे काढून व्हीआयपी संस्कृती संपणार नाही तर त्या सोबत शासकीय खर्चाने होणारे मंत्र्यांचे होणारे परदेश दौरे , स्वागत सोहळे आणि स्वतःचे फोटो टाकून होणारी जाहिरात बाजीही थांबवली पाहिजे. मी विरोधी पक्षनेता या पदाला कॅबिनेट दर्जा असल्याने मी ही  उद्यापासून लाल दिव्याची गाडी वापरणार नाही असा निर्धार मुंडे यांनी केला आहे.

संबंधित लेख