संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मीच मेस्मा लावू दिला नाही, दिवाकर रावतेंचा गौप्यस्फोट 

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मीच मेस्मा लावू दिला नाही, दिवाकर रावतेंचा गौप्यस्फोट 

मुंबई : वेतनवाढीचा मुद्दा घेऊन एसटी कामगारांनी संप केला होता. प्रवाशांचे होणारे हाल एसटी व कामगारांच्या अवाच्या सव्वा मागण्या यामुळे संप मिटण्याची चिन्हे दिसत नव्हती. त्यामुळे या कामगारांवर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्याची येण्याची तयारी व्यवस्थापनाने केले होते. मात्र, मी मेस्मा लावू दिला नाही, असा गौप्यस्फोट परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केला आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांनी नुकताच संप पुकारला होता. दोन दिवस कडकडीत बंद पाळत कामगारांनी प्रशासनाच्या नाकात दम आणला. त्यानंतर तडजोड होत संप माघारी घेण्यात आला. या संपात सहभाग घेणाऱ्या 1010 कंत्राटी कामगारांवर एसटीने निलंबनाची कारवाई केली आहे. त्याविरोधात कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर रावते 'सकाळ'शी बोलत होते.

ते म्हणाले, " या कंत्राटी कामगारांचा संपाशी काहीही संबंध नव्हता. तरीही या कामगारांनी संपात भाग घेतला. त्यामुळे प्रशासन संतप्त आहे. कामगारांनी कोणतीही पूर्वर सूचना न देता संप पुकारला होता. वेतनवाढ घोषीत करूनही संप करत असतील तर मग प्रशासन तरी काय करणार होते ? त्यामुळे कामगारांवर मेस्मा कायदा लावण्याची तयारी व्यवस्थापन करत होते. मात्र मी मेस्मा लावू दिला नाही. कामगार संघटनांशी चर्चा करून मार्ग काढला असल्याचा दावा रावते यांनी केला. 


 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com