state will send recommendation within month : Jankar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

धनगर आरक्षणाचे सर्व काही रेडी आहे : जानकर

अभिजित घोरमारे
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

गोंदिया : धनगर समाजाला अनुसूचित जमातींत आरक्षणासाठी येत्या एक ते दीड महिन्यांत केंद्र सरकारडे शिफारस पाठवू, अशी महिती राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दिली.

मराठा समाजाला मागासवर्गीयांमध्ये आरक्षण देण्यासाठीचा अहवाल राज्य सरकारला काल प्राप्त झाल्यानंतर धनगर आरक्षणाचे काय झाले, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर जानकर यांनी गोंदियात बोलताना वरील स्पष्टीकरण दिले.

त्यांनी सांगितले की दोन्ही समाजा संबंधींचे अहवाल हे राज्य शासनाला प्राप्त झाले आहेत.  धनगर आरक्षणाबाबत केवळ केंद्राकडे शिफारश करणे बाकी आहे. ती येत्या एक ते दीड महिन्यात केंद्राकडे पाठवू. त्यामुळे आता लवकरच धनगर समाजाचा आरक्षणाचा मार्ग देखील आता मोकळा होणार आहे.

या समाजाच्या आऱक्षणासाठी सर्व काही रेडी केलेले आहे. त्याची तारीख सांगत नाही पण येत्या एक ते दीड महिन्यांत आम्ही शिफारस पाठवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी टाटा समाजविज्ञान संस्थेकडे काम सोपविण्यात आले होते. धनगर हा समाज अनुसूचित जमातीत मोडतो का, याचा अभ्यास या संस्थेने केला आहे. राज्यात धनगड ही जमात अनुसूचित वर्गात मोडते. त्यामुळे धनगर आणि धनगड एकच आहेत का, याचे उत्तर या संस्थेच्या अहवालात मिळणार आहे. हा अहवाल अनुकूल असल्यास राज्य सरकार तशी केंद्र सरकारडे शिफारस करेल. अनुसूचित वर्गात घेण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे.

संबंधित लेख