state legislative asembali | Sarkarnama

विधिमंडळातल्या समित्यांवर विदर्भाला झुकते माप

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

अकोला : राज्य विधिमंडळाच्या जाहीर करण्यात आलेल्या विविध समित्यांमध्ये विदर्भाला झुकते माप मिळाले आहे. विशेष म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे गटाचे समजल्या जाणाऱ्या आमदार गोवर्धन शर्मा यांची इतर मागासवर्गीय कल्याण समितीच्या प्रमुख पदावर वर्णी लागली असून, अनुसूचित जाती कल्याण समिती प्रमुख पदावर आमदार हरिश पिंपळे यांची निवड करण्यात आली. विधीमंडळाच्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पंचायतराज समितीवर भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांची निवड करण्यात आली आहे. 

विधिमंडळाच्या 2017-18 या वर्षासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विविध समित्यांवर विधानसभा व विधान परिषद सदस्यांची निवड जाहीर केली आहे. समित्यांच्या या निवड प्रक्रियेत विदर्भातील आमदारांना महत्त्वपूर्ण समित्यावर नियुक्‍त्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांना विमुक्त जाती व भटक्‍या जमाती कल्याण समितीचे प्रमुख पदावर निवड करण्यात आली आहे. तर अनुसूचित जाती कल्याण समितीच्या प्रमुखपदी आमदार हरिश पिंपळे यांची निवड करण्यात आली असून, समिती सदस्य पदावर वाशिमचे आमदार लखन मलीक यांची निवड करण्यात आली आहे. 

विधिमंडळाच्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पंचायतराज समितीवर भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्यासह कॉंग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच भाजपचे ज्येष्ठ आमदार चैनसुख संचेती यांना अल्पसंख्यांक कल्याण समितीचे प्रमुख करण्यात आले आहे. लोकलेखा समितीवर आमदार राजेंद्र पाटणी, अंदाज समितीवर आमदार डॉ. संजय रायमुलकर, इतर मागासवर्गीय कल्याण समितीवर आमदार बळीराम सिरस्कार, सार्वजनिक उपक्रम समितीवर आमदार अमित झनक, आमदार हर्षवर्धन सपकाळ, विशेष हक्क समिती तसेच आश्वासन समितीवर आमदार प्रकाश भारसाकळे, नियम समितीवर आमदार आकाश फुंडकर, सदस्य अनुपस्थिती समितीवर आमदार शशिकांत खेडेकर, सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवण्याबाबत तर्दथ समितीवर आमदार संजय रायमूलकर यांची निवड करण्यात आली आहे. 
 
संबंधित लेख