state govt recommends Bharatratn for Mahatma Phule and savittribai phule | Sarkarnama

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाईंना भारतरत्न देण्याची राज्याची शिफारस

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

राज्य सरकारने महात्मा फुले आणि सावित्राबाईंना भारतरत्न देण्याची शिफारस केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. ही शिफारस केंद्र सरकारने मान्य केल्यास तो एक ऐतिहासिक निर्णय ठरेल. 

पुणे : महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ओबीसी महासंघाच्या मेळाव्यात दिली.

ओबीसींच्या मागण्यांसदर्भात आपण स्वतः केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे सांगत फडणवीस यांनी ओबीसींना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही मागणी  वेगवेगळ्या सामाजिक घटकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यावर अखेर राज्य सरकारने शिक्कामोर्तब करून ही शिफारस केंद्र सरकारकडे गेल्याने या प्रक्रियेतील एक टप्पा आता पूर्ण झाला आहे. 

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात करून सामाजिक क्रांतीची प्रक्रिया गतिमान केली होती. त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कामाचा गौरव करावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही  लोकसभेतअधिवेशनात केली होती. 

संबंधित लेख