state government targets ajit pawar : Bhujbal | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

अजित पवारांना त्रास देण्याचा उद्देश : भुजबळ

उमेश घोंगडे
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

पुणे : ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचा उल्लेख असलेले प्रतिज्ञापत्र सादर करून राजकीय खेळी केली आहे, अशी टीका माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुण्यात केली.

सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू असताना आता निवडणुकीच्या तोंडावर हा विषय राज्य सरकारने उकरून काढल्याचे भूमिका भुजबळ यांनी मांडली आहे. यामागे केवळ त्रास देण्याच्या उद्देश असून जाणीवपूर्वक राज्य सरकारने ही खेळी केल्याची टीका त्यांनी केली. 

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते समता पुरस्कार देण्यात आला. यावेळी भुजबळ बोलत होते. यावेळी मराठा आरक्षणाबाबत त्यांनी आज पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली.
 
पुण्यातील समता भूमी राष्ट्रीय स्मारक व्हावे, ही सुरवातीपासूनची मागणी आहे. अनेक वर्षापासून हे काम रखडले आहे. त्यासाठी सुरवातीपासून आम्ही पाठपुरावा करीत आहोत. मात्र सध्याचे राज्य सरकार सकारात्मक प्रतिसाद देत नाही. वास्तविक स्मारकासाठी कोट्यवधींचा खर्च नाही. काही लाखांचा प्रश्‍न आहे. मात्र राज्य सरकार पावले उचलत नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.

संबंधित लेख