state government employee | Sarkarnama

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आज मागे घेण्यात आला आहे. गेले तीन दिवस या कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. सरकारने सर्व रिक्त पदे भरावीत, तसेच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी तातडीने करावी, तसेच महागाईभत्याची थकबाकी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता. संपाचा आजचा तिसरा दिवस होता. 

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र कर्मचाऱ्यांनी सरकारचे आवाहन धुडकावून लावले होते. संपातून राजपत्रित अधिकारी महासंघाने माघार घएतली होती. कालपासून या संपावर तोडगा काढण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू होते. कर्मचारी संघटनांनी बेमुदत संपाचा इशारा दिला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख