state government employee | Sarkarnama

संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या तीन दिवसाच्या संपाला सुरवात झाली असली तरी राज्य सरकारने आता यासंदर्भात कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल असे राज्य सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

राजपत्रित अधिकारी संघटनेने या संपातून माघार घेतली आहे. मात्र अन्य संघटनांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. संपामुळे राज्यात आज विविध सरकारी रुग्णालये आणि अनेक सरकारी कार्यालयामधले कामकाज विस्कळीत झाले आहे. राज्य सरकारने सातवा वेतन आयोग जानेवारीपासून लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख