कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची औरंगाबादवारी  उमेदवार चाचपणीसाठी ?

औरंगाबादला काँग्रेस पक्षाचा लोकसभेसाठी योग्य उमेदवार शोधणे हे जिकिरीचे काम आहे . याबरोबरच निवडलेल्या उमेदवाराच्या पाठीशी अन्य स्थानिक नेत्यांना उभे करणे हे त्यापेक्षाही अवघड काम आहे . अशोक चव्हाण यांचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील , रामकृष्णबाबा पाटील , केशवराव औताडे यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत . मात्र त्यांना आता तरुण नेत्यांची फळी बांधावी लागणार आहे . त्यासाठी कल्याण काळे , सुभाष झांबड आदी तरुण नेत्यांना मदतीला घ्यावे लागणार आहे .
ashok-chavan
ashok-chavan

औरंगाबाद :  आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजप, शिवसेना या तयारीत आजघडीला सर्वात पुढे असली तरी राज्यात व देशात पुन्हा सत्ता परिवर्तन घडवण्यासाठी कॉंग्रेसनेही कंबर कसली आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण गुरुवारी (ता. 21) औरंगाबादेतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. 

सहा महिन्यापुर्वी शहरात अशोक चव्हाण यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता शिबिर घेण्यात आले होते. या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व विधानसभा व औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी देखील त्यांनी केली होती. त्यानंतर मात्र कॉंग्रेसच्या गोटात काहीच हालचाली झाल्या नाहीत. 

कर्नाटक राज्यातील निवडणूकीमुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व्यस्त होते. मात्र आता पुन्हा त्यांनी जोमोन कामाला सुरुवात केल्याचे दिसते. औरंगाबाद लोकसभा व जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघावर कॉंग्रेसने आपले लक्ष केंद्रित केले आहे. 

आगामी निवडणुका लक्षात घेता जिल्ह्यातील बुथ कमिटी सदस्यांचा मेळावा कॉंग्रेसच्या वतीने उद्या सकाळी दहा वाजता शहरातील सागर लॉन येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यावेळी बुथ कमिटी सदस्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिवाय आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रदेशचे पदाधिकारी, सर्व सेलचे अध्यक्ष, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका सदस्य व ब्लॉक अध्यक्षांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. 

येत्या डिसेंबरमध्ये लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्याच्या मेळाव्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार कोण असेल यावर देखील चर्चा होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com