वाकडी घटनेच्या ट्वीटवरुन राज्य बालहक्क आयोगाची राहुल गांधींना नोटिस

वाकडी येथे मातंग समाजाच्या दोन मुलांना विहिरीत उतरल्याच्या कारणावरून मारहाण करुन त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. या घटनेने राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर 15 जून रोजी राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन या घटनेचा निषेध केला होता
वाकडी घटनेच्या ट्वीटवरुन राज्य बालहक्क आयोगाची राहुल गांधींना नोटिस

मुंबई - जळगाव जिल्ह्यातील वाकडी येथे मुलांना मारहाण होत असल्याचा व्हिडिओ आपल्या ट्वीटर हँडलवरुन ट्वीट केल्याप्रकरणी राज्य बाल हक्क आयोगाने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटिस काढली आहे. 

'महाराष्ट्र के इन दलित बच्चों का अपराध सिर्फ इतना था कि ये एक "सवर्ण" कुएं में नहा रहे थे।  आज मानवता भी आखरी तिनकों के सहारे अपनी अस्मिता बचाने का प्रयास कर रही है। RSS/BJP की मनुवाद की नफरत की जहरीली राजनीति खिलाफ हमने अगर आवाज़ नहीं उठाई तो इतिहास हमें कभी माफ नहीं करेगा' असे राहुल गांधी यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

वाकडी येथे मातंग समाजाच्या दोन मुलांना विहिरीत उतरल्याच्या कारणावरून मारहाण करुन त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. या घटनेने राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर 15 जून रोजी राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन या घटनेचा निषेध केला होता. मात्र, या ट्वीटमध्ये त्यांनी घटनेचा व्हिडिओही अपलोड केला आहे. त्यात दोन्ही मुलांचे चेहेरे स्पष्ट दिसत आहेत. या घटनेवरुन मुंबईतील चिराबाजार येथे राहणाऱ्या अमोल जाधव यांनी बालहक्क आयोगाकडे  ज्युवेनाईल जस्टिस अॅक्ट आणि पाॅक्सो (प्रोटेक्शन आॅफ चिल्ड्रन फ्राॅम सेक्स्युअल आॅफेन्सेस अॅक्ट) खाली तक्रार केली. या तक्रारीवरूनच बालहक्क आयोगाने राहुल गांधींना व ट्वीटरला नोटीस बजावली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com