stalin dmk chief unappose | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

करूनानिधींचे स्टॅलिनच वारसदार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

चेन्नई ः द्रमुक पक्षाच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे एम. के. स्टॅलिन यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. पाच दशके पक्षाची धुरा सांभाळणारे एम. करुणानिधी यांचे निधन झाल्याने त्यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचे पुत्र व पक्षाचे कार्याध्यक्ष स्टॅलिन यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. खजिनदारपदी दुराई मुरुगन यांची निवड झाली. 

स्टॅलिन (वय 65) हे पक्षाचे दुसरे अध्यक्ष आहेत. पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याची माहिती सरचिटणीस के. अनभगन यांनी पक्षाच्या कार्यकारी बैठकीत सांगितले. करुणानिधी यांचे निधन 7 ऑगस्ट रोजी झाले. त्यानंतर तीन आठवड्यांनी स्टॅलिन यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. स्टॅलिन यांचे मोठे बंधू व द्रमुकमधून बडतर्फ केलेले नेते एम. के. अळगिरी यांनी आपल्याला पक्षात पुन्हा घेतले नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. 

द्रमुकच्या अध्यक्षपदी स्टॅलिन यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अनभगन यांनी केल्यानंतर बैठकीला उपस्थित सदस्यांनी "दलपती' (नेता) अशी घोषणा देत त्यांचे स्वागत केले. करुणानिधी यांनी 1969 मध्ये पक्षाचे अध्यक्षपद प्रथम स्वीकारले होते. त्यानंतर 49 वर्षे त्यांनी पक्षाचे नेतृत्व केले होते.

 करुणानिधी यांनी सामाजिक जीवनातील सहभाग बंद केल्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून स्टॅलिन यांनी पक्षाची जबाबदारी सांभाळली होती. चेन्नईचे उपमहापौरपद असलेले स्टॅलिन यांची द्रमुक 2006 मध्ये सत्तेत असताना मंत्रिमंडळात निवड झाली होती. पुढे उपमुख्यमंत्रिपदीही त्यांची निवड झाली होती.  
 
टॅग्स

संबंधित लेख