ST workers to go on indefinete strike in July | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

एसटी कामगारांचा जुलैमध्ये बेमुदत संप ?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

ज्या वेळी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होईल, त्यावेळी एसटी कामगारांना पदनिहाय वेतनश्रेण्यांसह सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा

मुंबई  : सातवा वेतन आयोग लागू करा, यासह अन्य काही मागण्यांवरून एसटी महामंडळ आणि मान्यताप्राप्त एसटी संघटनेतील वाद विकोपाला जात असल्याची चिन्हे आहेत. मागण्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनांसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या अन्य काही संघटनांनी जुलै महिन्यात बेमुदत संप करण्याची तयारी चालवली आहे. संपाची तारीख निश्‍चित करण्यासाठी लवकरच बैठकही घेण्यात येणार आहे. 

सातवा वेतन आयोग लागू करा, ही मागणी करत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने सध्याचा चार वर्षांचा करार केलेला नाही. या आयोगामुळे कामगारांना चांगला पगार मिळेल, अशी आशा संघटनांना आहे. एसटी महामंडळाने या मागणीवर अद्याप विचार केला नसल्याने संपाची तयारी केली आहे. त्यासाठी 26 व 27 मे रोजी कामगारांचे मत जाणून घेण्यासाठी राज्यभर मतदानही घेण्यात आले.

 मतदानामध्ये 85 हजार 55 कामगारांनी मतदान केले. त्यापैकी 84 हजार 975 कामगारांनी संपाला पाठिंबा दिला, तर 75 कामगारांनी त्याविरुद्ध मत नोंदविले आणि 5 कामगारांची मते बाद झाली आहेत.

यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी सांगितले की, कामगारांनी संप करण्यास दिलेला पाठिंबा विचारात घेऊन ज्या वेळी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होईल, त्यावेळी एसटी कामगारांना पदनिहाय वेतनश्रेण्यांसह सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, अन्यथा मतदानाचा कौल विचारात घेऊन संघटनेकडून बेमुदत संप पुकारण्यात येईल. हा संप जुलै महिन्यात करण्यात येणार असून त्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. 

संबंधित लेख