रावतेंना एसटी संप मिटवायचा आहे की चिघळवायचा आहे ? : धनंजय मुंडे 

रावतेंना एसटी संप मिटवायचा आहे की चिघळवायचा आहे ? : धनंजय मुंडे 

मुंबई : एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील जनतेचे हाल होत असताना परिवहन मंत्री दिवाकर रावते हे करीत असलेले वक्तव्य पाहता त्यांना संप मिटवायचा आहे का चिघळवायचा आहे ? असा सवाल विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. 

ऐन दिवाळीत सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यभरातील लाखो प्रवाशांचे हाल होत असून, या प्रकरणी सरकारने तातडीने एस टी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढावा अशी मागणी मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की एसटीचे कर्मचारी त्यांच्या न्याय मागण्यांसाठी मागील अनेक दिवसांपासून संघर्ष करीत असताना सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यामुळेच त्यांच्यावर संपासारखे हत्यार उपसण्याची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष दिले असते तर आज राज्यातील प्रवाशांचे हाल झाले नसते.'' 

कर्मचाऱ्यांच्या मागण्या अतिशय रास्त असून, या बाबत मुख्यमंत्र्यांनी सन्मानजनक तोडगा काढुन प्रवाशांचे हाल वाचवावेत तसेच कर्मचाऱ्यांनादेखील योग्य न्याय द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यातील संगणक परिचालकांच्या सुरू असलेल्या आंदोलनाकडेही मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधुन या आंदोलनाचीही दखल घेऊन या संगणक परिचालकांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली. यावेळी त्यांच्या समवेत परभणीचे आ.विजय भांबळे, आमदार विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्राताई वाघ उपस्थित होत्या. 

एस.टी.चे कर्मचारी त्यांच्या न्याय मागण्यांसाठी मागील अनेक दिवसांपासून संघर्ष करीत असताना सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यामुळेच त्यांच्यावर संपासारखे हत्यार उपसण्याची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष दिले असते तर आज राज्यातील प्रवाशांचे हाल झाले नसते असे मुंडे म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com