st bus service disturb in baramati | Sarkarnama

आंदोलनामुळे बारामतीत एसटीची सेवा विस्कळीत 

मिलिंद संगई
बुधवार, 25 जुलै 2018

बारामती शहर : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सुरक्षिततेचा उपाय म्हणून बारामती शहर व एमआयडीसीतील एसटीची सेवा बंद ठेवण्यात आली होती. सकाळपासूनच आंदोलनाची तीव्रता अधिक असल्याने पोलिस प्रशासनाच्या विनंतीवरुन सेवा थांबविल्याची माहिती आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली.
 

बारामती शहर : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सुरक्षिततेचा उपाय म्हणून बारामती शहर व एमआयडीसीतील एसटीची सेवा बंद ठेवण्यात आली होती. सकाळपासूनच आंदोलनाची तीव्रता अधिक असल्याने पोलिस प्रशासनाच्या विनंतीवरुन सेवा थांबविल्याची माहिती आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली.
 
आज सकाळपासूनच बारामती आगारातून एकही बस बाहेरच पडली नाही. एसटी गाड्यांचे नुकसान होऊ नये या साठी सर्व बसेस आगारातच लावून ठेवण्यात आल्या होत्या. काल बारामती आगारातून जाणा-या गाड्या बंद असल्याने 22452 कि.मी. अंतराच्या 452 फे-या रद्द झाल्या, त्या मुळे एसटीचे 10 लाख 16 हजारांचे नुकसान झाल्याचेही गोंजारी यांनी सांगितले. आजही एसटीला पाच लाखांचे नुकसान सहन करावे लागेल, असे त्यांनी सांगितले. 

दुपारी तीन पर्यंत एसटीची सेवा ठप्प होती. पोलिस प्रशासनाकडून जो पर्यंत संदेश येत नाही तो वर एसटी रस्त्यावर उतरावयची नाही असा निर्णय घेतल्याने आज अनेकांना आपला प्रवासाचा बेत रद्द करावा लागला. बारामतीतून दररोज सरासरी सात हजार प्रवासी एसटीने प्रवास करतात. दुपारी तीन नंतर हळुहळू एसटी रस्त्यावर आणण्यास प्रारंभ झाला होता.  दुसरीकडे बारामती एमआयडीसी आगाराचे काल 7561 कि.मीच्या फे-या रद्द झाल्यामुळे 3 लाख 60 हजारांचे नुकसान झाले. 

अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल

दरम्यान काल प्रशासकीय इमारतीवर दगडफेक करुन एक लाखांचे नुकसान केल्याबद्दल अज्ञात सहा जणांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान प्रशासकीय इमारतीचे झालेले नुकसान भरुन देण्याची ग्वाही प्रदीप शिंदे व सहका-यांनी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणाचेच नुकसान करण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा हेतू नाही, काही समाजकंटकांनी गालबोट लावण्याचा केलेला प्रयत्न चुकीचा असून आम्ही नुकसान भरपाईस तयार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान कालच्या दगडफेकीत जखमी झालेल्या फैय्याज शेख तसेच मोहन शिंदे यांना तर नुकसान झालेल्या मोहसिन बागवान यांना आज गटनेते सचिन सातव, नगरसेवक गणेश सोनवणे, नवनाथ बल्लाळ यांनी आर्थिक मदत करत त्यांची विचारपूस केली. 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख