युती झाल्यास शिवसेनेचा अकोल्यातील तीन जागांवर दावा

लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती अंतिम टप्प्यात आहे. कोणत्याही क्षणी त्याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. अशा परिस्थितीत राज्यात राबविण्यात येणारा फिप्टी-फिप्टीचा फार्म्युला यावेळी अकोला जिल्ह्यातही कायम रहावा, अशी भावना सर्वसामान्य शिवसैनिकांची आहे. त्यामुळे यावेळी शिवसेना युतीत अकोला लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघावर दावा करणार असल्याची विश्‍वसनिय माहिती आहे.
युती झाल्यास शिवसेनेचा अकोल्यातील तीन जागांवर दावा

अकोला : लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती अंतिम टप्प्यात आहे. कोणत्याही क्षणी त्याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. अशा परिस्थितीत राज्यात राबविण्यात येणारा फिप्टी-फिप्टीचा फार्म्युला यावेळी अकोला जिल्ह्यातही कायम रहावा, अशी भावना सर्वसामान्य शिवसैनिकांची आहे. त्यामुळे यावेळी शिवसेना युतीत अकोला लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघावर दावा करणार असल्याची विश्‍वसनिय माहिती आहे. 

अकोला जिल्ह्यातील पाच आणि वाशीम जिल्ह्यातील रिसोड अशा सहा विधानसभा मतदारसंघ मिळून अकोला लोकसभेची रचना झाली आहे. गत २५ वर्षांपासून एक-दोन वेळा सोडता या मतदारसंघात भाजपचे खासदार सातत्याने निवडून आले आहेत. विद्यमान खासदार संजय धोत्रे तिसऱ्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आता चाैथ्यांदाही भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून तेच रिंगणात राहणार आहेत. अशावेळी जिल्ह्यात शिवसेना भाजपला विधानसभेत बरोबरीचा वाटा मागण्याची दाट शक्यता आहे. 

या मतदारसंघावर होऊ शकतो दावा
शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून नेहमीच अकोटकडे बघितल्या जाते. शिवाय शहरातील दोन मतदारसंघांपैकी अकोला पूर्व हा युतीमध्ये शिवसेनेकडे राहत आला आहे. मात्र, गतवेळी भाजपने हा संघ ताब्यात घेतला. आमदार रणधीर सावरकर यांची या मतदारसंघावरील पकड लक्षात घेता तो शिवसेनेला मिळण्याची शक्यता कमीच आहे. अशा परिस्थितीत मूर्तिजापूर आणि बाळापूर या दोन विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेकडून नव्याने दावा केला जाण्याची दाट शक्यता आहे. तशी चर्चा सध्या शिवसेनेच्या गोटात रंगत आहे. 

भाजपसाठी अकोट, मूर्तिजापूर धोकादायक
भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणासह शासकीय पातळीवर गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या चाचपणीत जिल्ह्यातील अकोट, मूर्तिजापूर हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी धोकादायक ठरू शकतात. अकोटमध्ये विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांचा जनाधार १९ टक्क्यांपर्यंत खाली आला असून, मूर्तिजापूरमध्ये आमदार हरीष पिंपळे यांचा जनाधार ३५ टक्क्यांपर्यंतच असल्याची माहिती अलिकडच्या काही चाचपणीत पुढे आली असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत भाजपला हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडताना कोणतीही अडचणी येण्याची शक्यता नसल्याचेही बोलल्या जात आहे.  


विधानसभेतील शिवसेनेची कामगिरी 

  • मतदारसंघ        २०१४         २००९
  • अकोट :             १४,०२४      ३७,८३४ 
  • बाळापूर :             ६,७२२     भाजप   
  • अकोला पश्‍चिम : १०,५७२     भाजप
  • अकोला पूर्व :       ३५,५१४    ३४,१९४
  • मूर्तिजापूर :         २४,४८६    भाजप
     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com