special session after commission report : CM | Sarkarnama

आयोगाच्या अहवालानंतरच मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन : मुख्यमंत्री

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल येणे बाकी आहे. हा अहवाल आल्यानंतरच विधीमंडळांचे विशेष अधिवेशन घेणे, उचित ठरेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले.

सकल मराठा समाजाच्यावतीने सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यांतील सर्व पक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेऊन कोल्हापूर जिल्हयांतील आंदोलकांच्या मागण्या कानावर घातल्या. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर विशेष अधिवेशन बोलावणे योग्य ठरेल, असे सांगितले.

सकल मराठा समाजाच्यावतीने कोल्हापूर जिल्हयांत सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी कोल्हापूरात सर्वपक्षीय आमदार, खासदार यांना बैठकीला बोलावून त्यांच्यासमोर काही मागण्या केल्या होत्या. यामध्ये सरकारने ताबडतोब विशेष अधिवेशन बोलवावे. तसेच येत्या चार सप्टेंबर रोजी कोल्हापूर ते मुंबई असा वाहन मोर्चा निघणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना केले होते.

या आंदोलकांच्या भावना आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या भेटीत या आमदारांनी व्यक्त केल्या. यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की माझ्यावतीने आणि लोकप्रतिनिधी या नात्याने आंदोलकांच्या भावनेचा विचार करीत त्यांना शांततामय मार्गाने आंदोलन करण्यासह सांमज्यशाची भूमिका घेण्याचे आवाहन करा. यावर आम्ही कोल्हापूरला गेल्यानंतर आंदोलकांपर्यत आपला संदेश पोहचवू, असे या बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितल्याचे समजते.

समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर शांततेत आंदोलन झाल्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाची गंभीर दखल घेत सर्वपक्षीय नेते, आंदोलक यांची बैठक बोलावून काही चर्चा केली होती. यानंतर आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन घेण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले होते.  

संबंधित लेख