sonia-gandhi-rahul-gandhi-are on bail-they-should-not-speak-against-narendra-modi-subhash-bhamre | Sarkarnama

सोनिया, राहूल जामीनावरचे लोक; त्यांनी मोदींविषयी बोलु नये : डॉ. सुभाष भामरे

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 12 जून 2018

श्रीमती सोनिया गांधी, राहूल गांधी हे जामीनावर सुटलेले लोक आहेत. त्यांना पंतप्रधानांविषयी बोलण्याचा अधिकारच नाही.  

-संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे  

नाशिक :  "श्रीमती सोनिया गांधी, राहूल गांधी हे जामीनावर सुटलेले लोक आहेत. त्यांना पंतप्रधानांविषयी बोलण्याचा अधिकारच नाही,'' असे वक्तव्य संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज येथे केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवानाल धोका असल्याचे पत्र संशयास्पद असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकताच केला होता.

यासंदर्भात डॉ. भामरे म्हणाले, "पंतप्रधान देशाचे असतात. त्यांच्या जीवाला धोका असल्याचे यापूर्वी अनेकदा स्पष्ट झाले आहे. सध्या जी चर्चा सुरु आहे ती बरोबर नाही. कारण पंतप्रधानाना धोका असल्याचे इनपुट पोलिसांचे नव्हे तर इंटेलीजन्स विभागाचे आहे. ही सर्वच माहिती शेअर करता येत नाही. त्यामुळे विरोधक जे बोलतात ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांचे ते कामच आहे. आपली दुकानदारी चालावी म्हणुन ते लोक बोलतात. "

यावेळी एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी "नॅशनल हेराल्ड केस मध्ये श्रीमती सोनिया गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांना न्यायालयाने जामीनावर सोडले आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांविषयी बोलुच नये. त्यांना तो अधिकार नाही,"असे सांगितले. 

 

Subhash Bhamre Sharad Pawar Rahul Gandhi Soniya Gandhi 

संबंधित लेख