Sonia Gandhi never interfered in defense deals : A.K. Antony | Sarkarnama

संरक्षण खरेदी व्यवहारात सोनिया गांधींनी कधीही हस्तक्षेप केला नाही :अँटनी

वृत्तसंस्था
सोमवार, 31 डिसेंबर 2018

राफेल घोटाळ्यात संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी भाजप मान्य करीत नाही. आपले बिंग फुटण्याची भीती त्यांना वाटत असावी.

-अँटनी 

नवी दिल्ली : " देशाच्या संरक्षण सामग्री खरेदी व्यवहारात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही, '' असे माजी केंद्रीय संरक्षणमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते ए. के. अँटनी यांनी सांगितले. 

पत्रकारांशी बोलताना श्री. अँटनी म्हणाले, " नरेंद्र मोदी यांचे भाजपचे सरकार शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून खोट्या गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे चुकीचे आहे. ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणामध्ये ख्रिस्तियन मिशेल हा दलाल होता. या दलालाला हाताशी धरून भाजप सरकार आपल्या हवे आहे ते वदवून घेत आहे,'' असा आरोप श्री. अँटनी यांनी केला. 

" राफेल जेट खरेदीमध्ये गंभीर स्वरूपाचा घोटाळा झाला आहे. कॉंग्रेस पक्षाने हा घोटाळा चव्हाट्यावर आणला आहे. त्यामुळे घाबरलेल्या सरकारने तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू केला आहे. राफेल घोटाळ्यात संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी भाजप मान्य करीत नाही. आपले बिंग फुटण्याची भीती त्यांना वाटत असावी," असेही श्री. अँटनी म्हणाले. 

संबंधित लेख