Somnath Chatarjee Dies at 89 | Sarkarnama

लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

लोकसभेचा माजी सभापती व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सोमनाथ चटर्जी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. किडनीच्या विकाराने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

कोलकत्ता - लोकसभेचा माजी सभापती व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सोमनाथ चटर्जी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. किडनीच्या विकाराने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

ते १४ व्या लोकसभेचे सभापती होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल राज्यातील बरद्वान मतदारसंघातून आणि इ.स. १९७७ आणि इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगाल राज्यातील जादवपूर मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. अभ्यासू वृत्ती, आपला मुद्दा कौशल्याने मांडायची हातोटी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला प्रभाव पाडला होता. 

जुलै इ.स. २००८ मध्ये मनमोहन सिंह सरकारवरील विश्वासदर्शक ठरावादरम्यान त्यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा न देता सभाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. त्या कारणावरून त्यांचे कार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद झाले आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. २००९ ची लोकसभा निवडणुक न लढवता सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली.
(स्त्रोत सौजन्य - विकीपिडीया) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख