some officers love files more than wife : Gadakari | Sarkarnama

काही अधिकाऱ्यांचे प्रेम बायकोपेक्षा फायलींवर : गडकरी

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

नागपूर : "काही अधिकाऱ्यांना चिरीमिरी मिळाल्याशिवाय फाइल हलत नाही. या अधिकाऱ्यांचे बायकोपेक्षाही या फायलींवर अधिक प्रेम असते,' अशा शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना चिमटा काढला. 

नागपूर : "काही अधिकाऱ्यांना चिरीमिरी मिळाल्याशिवाय फाइल हलत नाही. या अधिकाऱ्यांचे बायकोपेक्षाही या फायलींवर अधिक प्रेम असते,' अशा शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना चिमटा काढला. 

इंडियन रोड कॉंग्रेसचे (आयआरसी) अधिवेशन शुक्रवारपासून नागपुरात सुरू झाले. या अधिवेशनासाठी संपूर्ण देशातील नामवंत बिल्डर, वरिष्ठ अधिकार, रचनाकार, विविध राज्यांचे सार्वजनिक बांधकाममंत्री नागपुरात आले आहेत. या अधिवेशनाचे उद्‌घाटन आज झाले. या उद्‌घाटन समारंभात बोलताना गडकरी यांनी लालफीतशाहीवर कडाडून हल्ला चढविला. अनेक विकासकामांच्या फायली लवकर सरकतच नसल्याने अनेकदा प्रकल्पांना उशीर होतो. या उशिरामुळे प्रकल्पांच्या किमतीमध्ये वाढ होते व लोकांना सुविधा मिळत नसल्याचे ते म्हणाले. 

अनेक अधिकारी तर फायलीवर असे काही बसून राहतात, की त्यांना फायलीचा मोह सोडवत नाही. असे वाटते, की त्यांचे बायकोपेक्षाही या फायलींवर अधिक प्रेम आहे. चिरीमिरी दिल्याशिवाय ही फाइल पुढे जात नाही असे सांगून, अधिकाऱ्यांच्या या मानसिकतेत बदल होण्याची आवश्‍यकता असल्याची सूचनाही गडकरी यांनी या वेळी केली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही भाषण झाले. 

संबंधित लेख