युतीबाबत काहींची नाराजी; पण उद्धव साहेबांचा आदेश अंतिम : गुलाबराव पाटील 

युतीबाबत काहींची नाराजी; पण उद्धव साहेबांचा आदेश अंतिम : गुलाबराव पाटील 

जळगाव : ``शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीबाबत शिवसैनिकांची मते वेगवेगळी आहेत. काहीची स्पष्ट नाराजीही आहे. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेवून आदेश देतील तो आमच्यासाठी अंतिम असेल. युती झाली तरीही जळगाव लोकसभा मतदारसंघ आम्ही शिवसेनेकडे घेण्यासाठी आग्रही आहोत,`` असे मत राज्याचे सहकार राज्यमंत्री व शिवसेनेचे उपनेते गुलाराबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

जळगाव व रावेर लोकसभा निवडणूकीसंदर्भात शिवसेनेची आज हॉटेल रॉयल पॅलेस येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षाचे जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख संजय सावंत, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, पक्षाचे अध्यक्ष गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मुंबईहून मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या एका टीमने कार्यकर्त्यांना आगामी निवडणूकीबाबत मार्गदर्शन केले.

यानंतर अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना गुलाबराव पाटील म्हणाले, कि पक्षाच्या बैठकित आम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघाबाबत भूमिका जाणून घेतल्या. पक्षाच्या काही कार्यकर्त्यांचा भाजपबरोबर युती करण्यास विरोध आहे. मात्र पक्षप्रमुख ठाकरेंनी युतीचा निर्णय घेतल्यास त्यांच्या आदेशानुसार युतीचे काम करणार. मात्र भाजपकडे असलेला जळगाव लोकसभा मतदार संघ यावेळी शिवसेनेतर्फे लढविण्यात यावा, असा आमचा आग्रह असून नवीन जागा वाटपाच्या फाॅर्म्यूल्यातही जळगावाचा शिवसेनेकडेच सामावेश असल्याचे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com