solapur university lingayat morcha | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

सोलापूर विद्यापीठाचा तिढा वाढला; लिंगायत समाजही मोर्चा काढणार! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 ऑगस्ट 2017

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी उद्या (सोमवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर कृती समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. विद्यापीठाला सिद्धेश्‍वर किंवा महात्मा बसवेश्‍वर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी शिवा संघटनाही आक्रमक झाली आहे. या मागणीसाठी 11 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा आज निर्णय झाला. 

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी उद्या (सोमवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर कृती समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. विद्यापीठाला सिद्धेश्‍वर किंवा महात्मा बसवेश्‍वर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी शिवा संघटनाही आक्रमक झाली आहे. या मागणीसाठी 11 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा आज निर्णय झाला. 

शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. मोर्चाचे नियोजन करण्यासाठी आज दुपारी सोलापूरच्या विश्रामगृहात शिवा संघटनेची बैठक झाली. सोलापुरातील कौतम चौकातील महात्मा बसवेश्‍वर पुतळा येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. बैठकीला संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माजी आमदार शिवशरण पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत शेटे, राज्य उपाध्यक्ष शैलेश जक्कापुरे, पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष विरभद्रेश बसवंती, जिल्हाध्यक्ष अरविंद भडोळे-पाटील उपस्थित होते. 

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव द्यावे यासाठी जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विविध संघटना एकवटल्या आहेत. उद्या चार हुतात्मा पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या नावाला राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मोहोळ नगरपरिषदेने अहिल्यादेवींच्या नावाचा ठराव करून कृती समितीला पाठिंबा दिला आहे. 

संबंधित लेख