solapur rural sp about 7 thousand crime files | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

सोलापूर जिल्ह्यातील 7 हजार गुन्हेगारांची क्राईम फाईल तयार 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

जिल्ह्यातील 87 गुन्हेगारी टोळ्या पोलिसांनी शोधल्या असून आता त्यांच्यावर तडीपार, स्थानबद्ध, मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात 2011 नंतर दोन पेक्षा अधिक गुन्हे केलेल्या सात हजार गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. या गुन्हेगारांनी आता कोणत्याही प्रकारचा गुन्हा केल्यास त्यांच्यावर गंभीर स्वरुपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

शरीराविषयी, मालाविषयी, वाळूचोरी यासह इतर गंभीर गुन्हे केलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. गेल्या तीन-चार महिन्यापासून या याद्या तयार करण्याचे काम सुरु होते. जिल्ह्यातील जवळपास सात हजार गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. आजवर जिल्ह्यातील 87 गुन्हेगारी टोळ्या पोलिसांनी शोधल्या असून आता त्यांच्यावर तडीपार, स्थानबद्ध, मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

या संदर्भातील कल्पना सर्व गुन्हेगारांना देण्यासाठी पोलिस ठाणे पातळीवर शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रयत्नानंतर नक्कीच सकारात्मक बदल होतील असेही पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. 

शासनाकडून पोलिसांना तपासाकरिता निधी उपलब्ध होत आहे. तसेच पोलिस ठाणे पातळीवर कार्यालयीन खर्चासाठी दहा हजार रुपये देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचेही पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षण अरुण सावंत उपस्थित होते. 

आम्ही जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांशी संवाद साधला आहे. आजवर त्यांच्यावर कोणत्या स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत हे त्यांना सांगितले आहे. यापुढे गुन्हा दाखल झाल्यास पोलिसांकडून कोणत्या प्रकारची कारवाई होईल हे समजावून सांगितले आहे. या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण येणार आहे. 
- मनोज पाटील, पोलिस अधीक्षक

संबंधित लेख