solapur prabhakar deshmukh arrest | Sarkarnama

अजितदादांना 'आत्मक्‍लेश करायला लावणारे' प्रभाकर देशमुख अटकेत! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 मार्च 2018

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वादग्रस्त भाषा बोलायला लावण्यासाठी कारणीभूत ठरलेले सोलापूर जिल्ह्यातील आंदोलन फेम प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख यांच्यावर आज पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

सोलापूर : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वादग्रस्त भाषा बोलायला लावण्यासाठी कारणीभूत ठरलेले सोलापूर जिल्ह्यातील आंदोलन फेम प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख यांच्यावर आज पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

प्रकरण मिटविण्यासाठी 72 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी त्यांना शहर पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून दुपारी भैय्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

एका प्रकरणात आपण मध्यस्थी करणार असल्याचे सांगत भैय्या देशमुख यांनी आपल्याकडे 72 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार एका महिलेने पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. 

चार वर्षापुर्वी प्रभाकर देशमुख हे नाव राज्यात गाजले होते. सोलापूर जिल्ह्यातील देशमुखांनी पाणीप्रश्‍नी उपोषण सुरु केले होते. या उपोषणासंबंधी अपमानास्पद टिप्पण्णी अजित पवार यांनी इंदापूर तालुक्‍यातील कार्यक्रमात केली होती. त्यामुळे पवारांवर जोरदार टीका झाली होती. यासंदर्भाने पवार आत्मक्‍लेश करण्यासाठी कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी गेले होते. या वक्‍तव्यामुळे पवारांचे मोठे डॅमेज झाले आहे. आजही त्या वक्‍तव्याची आठवण पवारांवर टीका करताना पवारविरोधक करत असतात. 

संबंधित लेख