Solapur news - solapur ZP CEO Bharud issue | Sarkarnama

`राष्ट्रवादी'च्या महिलांना धक्काबुक्की; डॉ. भारुडांचा चर्चेतून काढता पाय; जिल्हाधिकाऱयांची दिलगिरी

संतोष पवार
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

सांगोला तालुक्यातील चिकमहुद गावात उघड्यावर शौचास बसलेल्या महिलांच्या गळ्यात फुलांचे हार घालून फोटो सेशन करण्याऱ्या जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आक्रमक झाल्या. त्यामुळे डॉ. भारुड यांनी भेटण्यास आलेल्या `राष्ट्रवादी"च्या शिष्टमंडळाशी सुरू असलेल्या चर्चेतून काढता पाय घेतला. त्यानंतर पोलिसांनी शिष्टमंडळातील महिलांना धक्काबुक्की करीत केबिन बाहेर हाकलले. 

सोलापूर : सांगोला तालुक्यातील चिकमहुद गावात उघड्यावर शौचास बसलेल्या महिलांच्या गळ्यात फुलांचे हार घालून फोटो सेशन करण्याऱ्या जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आक्रमक झाल्या. त्यामुळे डॉ. भारुड यांनी भेटण्यास आलेल्या `राष्ट्रवादी"च्या शिष्टमंडळाशी सुरू असलेल्या चर्चेतून काढता पाय घेतला. त्यानंतर पोलिसांनी शिष्टमंडळातील महिलांना धक्काबुक्की करीत केबिन बाहेर हाकलले. 

संतप्त शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन झालेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यावेळी धक्काबुक्की झाल्याबाबत जिल्हाधिकाऱयांनी दिलगिरी व्यक्त करीत, विभागीय आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.  

या प्रकरणी माफी मागावी यासाठी सीईओ यांच्या दालनात शिष्टमंडळ दाखल झाले. माफी मागने दुरच, सीईओनी त्यांना केबिनमधुन पोलिसांकडून बाहेर काढले. मात्र या घडल्या प्रकाराबद्दल सामंजस्य दाखवत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

उघड्यावर शौचास जाणाऱ्या माहिलांबरोबर सीईओ भारुड यांनी फोटोसेशन केले होते. या विरोधात सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या निलंबनाची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी सीईओना भेटा म्हणून विनंती केली. म्हणून शिष्टमंडळ भेटण्यास गेले. घडल्या प्रकाराबद्दल माफी मागवी अशी मागणी सीईओ यांच्याकडे महिलांनी केली. यावेळी `मी चुकलो असेल तर नोकरीला लाथ मारतो. मी हार घालतानाचे फोटो दाखवा,' अशी मागणी भारुड यांनी महिलांकडे केली. 

महिला एेकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून भारुड यांनी महिलांनाच बाहेर काढण्यास पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अंदोलक महिलांना धक्के देत बाहेर काढले. या घडल्या प्रकाराबद्दल महिलांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना माहिती देत सीईओ भारुड यांच्या निलंबनाची मागणी केली.  धक्काबुक्कीबाबत जिल्हाधिकारी यांनी दिलगिरी व्यक्त करत योग्य कारवाईचे आश्वासन दिले.

संबंधित लेख