सोलापूर बाजार समितीवर झेंडा पालकमंत्र्यांचा, की सहकारमंत्र्यांचा ? 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नेते विरुद्ध कार्यकर्ते असा सामना रंगणार आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे भाजप विरोधकांच्या गोटातून निवडणूक लढवीत असल्याने पालकमंत्री विरुद्ध सहकारमंत्री अशी लढत या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
सोलापूर बाजार समितीवर झेंडा पालकमंत्र्यांचा, की सहकारमंत्र्यांचा ? 

सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नेते विरुद्ध कार्यकर्ते असा सामना रंगणार आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे भाजप विरोधकांच्या गोटातून निवडणूक लढवीत असल्याने पालकमंत्री विरुद्ध सहकारमंत्री अशी लढत या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. 

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रमुख दोन्ही पॅनेलने आपली नावे जाहीर केली आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सिद्धरामेश्‍वर बाजार समिती परिवर्तन पॅनेल विरुद्ध पालकमंत्री देशमुख यांच्यासह माजी आमदार दिलीप माने यांच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या श्री सिद्धेश्‍वर शेतकरी विकास आघाडीमध्ये लढत होणार आहे. 

यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे राज्य सरकारने या निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेला मतदानाचा अधिकार होय. त्याचबरोबर या नव्या अधिकारामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना या निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळाली आहे. 

निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रमुख दोन पॅनेलमधील उमेदवारांच्या नावाकडे लक्ष दिले असता शेतकऱ्यांपेक्षा किंवा सामान्य कार्यकर्त्यांपेक्षा नेतेमंडळींचीच संख्या जास्त दिसते. कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या सिद्धेश्‍वर शेतकरी विकास आघाडीकडून पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीप माने, कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा इंदुमती अलगोंडा, शिवसेनेचे नेते प्रकाश वानकर, कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे, माजी सभापती श्रीशैल नरोळे, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील असे तब्बल आठ प्रमुख उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या नावांकडे पाहिले असता या पॅनेलने कार्यकर्त्यांऐवजी नेतेमंडळींनाच उमेदवारी बहाल केली असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. 

सहकारमंत्री देशमुख यांच्या पॅनेलमधील नावांकडे पाहिले असता काही अपवाद वगळता कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पॅनेलमध्ये माजी आमदार शिवशरण पाटील, माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजित पवार, दक्षिण सोलापूर भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी हे प्रमुख नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे नेत्यांविरुद्ध कार्यकर्ते अशी ही निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्‍यता आहे. भाजपकडून या निवडणुकीची सर्व व्यूहरचना जिल्हाध्यक्ष शहाजी पवार हे आखत आहेत. 
कॉंग्रेसचे पाटील भाजपकडून रिंगणात 
कळमण गणातून माजी आमदार माने यांचे समर्थक असलेले संग्राम पाटील हे भाजपकडून रिंगणात उतरले आहेत. त्याचबरोबर दक्षिण सोलापूर मधील कॉंग्रेसचे अप्पासाहेब पाटील हेही भाजपकडून नशीब अजमावत आहेत. 
माजी आमदार बिराजदार सहकारमंत्र्यांसोबत 
सहकारमंत्री देशमुख यांच्या विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र आले आहेत. मात्र, माजी आमदार शिवशरण पाटील-बिराजदार हे पालकमंत्री देशमुख यांच्या संपर्कात होते. पण आजच्या घडामोडींवरून ते सहकारमंत्री देशमुख यांच्या पॅनेलचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. त्यामुळे पालकमंत्री देशमुखांसोबत असलेले माजी आमदार बिराजदार हे या निवडणुकीत सहकारमंत्री देशमुख यांच्या सोबतच राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com