सोलापूर महापालिका अंदाजपत्रकीय सभेवर गटबाजीचे सावट

महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेवर भाजपमधील गटबाजीचे सावट असून, सभा पुढे ढकलली जाण्याचे संकेत मिळत आहेत. अंदाजपत्रकाचा अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळाला नाही हे कारण सांगितले जात असले तरी, भांडवली निधीची खात्री न मिळाल्याने बजेट सभेलाच न जाण्याची भूमिका नगरसेवकांकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.
सोलापूर महापालिका अंदाजपत्रकीय सभेवर गटबाजीचे सावट

सोलापूर : महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेवर भाजपमधील गटबाजीचे सावट असून, सभा पुढे ढकलली जाण्याचे संकेत मिळत आहेत. अंदाजपत्रकाचा अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळाला नाही हे कारण सांगितले जात असले तरी, भांडवली निधीची खात्री न मिळाल्याने बजेट सभेलाच न जाण्याची भूमिका नगरसेवकांकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.

भाजपचे नूतन शहराध्यक्ष विक्रम देशमुख काल महापालिकेत आले होते. महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशीकला बत्तुल, सभागृह नेते संजय कोळी यांनी त्यांचे स्वागत केले. नगरसेवकांना अंदाजपत्रकाची माहिती होण्यासाठी अवधी मिळाला पाहिजे. त्यासाठी अंदाजपत्रकीय सभा पुढे ढकलता आली तर पहावी, अशी सूचना त्यांनी केली. दरम्यान, सायंकाळी  कोळी व बत्तुल यांनी महापौर बनशेट्टी यांची भेट घेऊन सभा पुढे ढकलण्याची विनंती केली. विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनीही सभा पुढे ढकलावी, ते शक्य नसल्यास परिवहन (ब) आणि पाणीपुरवठा (क) हे अंदाजपत्रक मंजूर करून घ्यावे आणि महापालिकेच्या (अ) अंदाजपत्रकासाठी पु्न्हा सभा घ्यावी, असे सुचवले आहे. त्यामुळे अंदाजपत्रकीय सभा होते की नाही हे गुरुवारी (ता. २७) सकाळीच स्पष्ट होणार आहे.

महापालिकेतील सभागृहनेता कार्यालय आणि शासकीय विश्रामधाम या दोन्ही ठिकाणी झालेल्या चर्चेदरम्यान, भांडवली निधी न देण्यावर आयुक्त ठाम होते. त्यामुळे बजेटच मिळणार नसेल तर सभा कशाला घ्यायची आणि चर्चा तरी कशाला करायची अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली आहे. दरम्यान, शिवसेना आणि कांग्रेसच्या नगरसेवकांच्याही  अंदाजपत्रकीय सभेबाबत बैठका सुरु झाल्या आहेत. सत्ताधारी भाजपच्या तुलनेत विरोधी पक्ष शिवसेनेची उपसूचना वरचढ होते की काय, अशी चर्चा आहे. भाजपमधील गटबाजी कायम राहिल्यास सर्व विरोधक एकत्रित येऊन शिवसेनेची उपसूचना कदाचित मंजूर करू शकतात अशी स्थिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com