solapur bjp crisis | Sarkarnama

सोलापूर : भाजप शहराध्यक्ष निंबर्गींचा पुतळा जाळला! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी आर्थिक व्यवहार करुन युवा मोर्चा शहर अध्यक्षपदाची नियुक्‍ती केल्याचा आरोप भाजपच्याच कार्यकर्त्यांनी केला आहे. या नाराज कार्यकर्त्यांनी या नियुक्‍तीचा निषेध म्हणून सिव्हील चौकातील भाजप कार्यालयाबाहेर निंबर्गी यांचा पुतळा जाळला. 

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी आर्थिक व्यवहार करुन युवा मोर्चा शहर अध्यक्षपदाची नियुक्‍ती केल्याचा आरोप भाजपच्याच कार्यकर्त्यांनी केला आहे. या नाराज कार्यकर्त्यांनी या नियुक्‍तीचा निषेध म्हणून सिव्हील चौकातील भाजप कार्यालयाबाहेर निंबर्गी यांचा पुतळा जाळला. 

निंबर्गी यांनी कोणालाही विश्वासात न घेता पुर्वाश्रमी कॉंग्रेसच्या असलेल्या आणि महापालिकेच्या तोंडावर तिकिट मिळवण्यासाठी भाजपमध्ये आलेल्या वृशाली चालुक्‍य यांची भाजप युवा मोर्चाच्या शहर अध्यक्षपदी निवड केली. ही निवड करताना त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप पुरुषोत्तम पोबात्ती, जय साळुंखे, विशाल धोत्रे, महांतेश झेंडेकर, रुपेश साळुंखे, रोहन माने, सादिक म्हेत्रे या भाजपा कार्यकर्त्यांनी केला. त्यांनी निषेधाच्या घोषणा देत निंबर्गी यांचा पुतळा जाळला. 

संबंधित लेख