'सोलापूर उत्तर'साठी अजित पवारांची दर्शनवारी! 

'सोलापूर उत्तर'साठी अजित पवारांची दर्शनवारी! 

महापालिका निवडणुकीत झालेला दारुण पराभव, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये असलेले मतभेद या पार्श्‍वभूमीवर येत्या निवडणुकीत सोलापूर शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस नामशेष होईल यासह अनेक प्रश्‍न उपस्थित होत होते. शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी यशस्वी केलेल्या हल्लाबोलने या प्रश्‍नांना "उत्तर' दिले आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख नेतृत्व करत असलेल्या सोलापूर उत्तर मतदार संघाला टार्गेट करत राष्ट्रवादीने 2019 ची तयारी सुरू केली आहे.

सोलापूर : महापालिका निवडणुकीत झालेला दारुण पराभव, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये असलेले मतभेद या पार्श्‍वभूमीवर येत्या निवडणुकीत सोलापूर शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस नामशेष होईल यासह अनेक प्रश्‍न उपस्थित होत होते. शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी यशस्वी केलेल्या हल्लाबोलने या प्रश्‍नांना "उत्तर' दिले आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख नेतृत्व करत असलेल्या सोलापूर उत्तर मतदार संघाला टार्गेट करत राष्ट्रवादीने 2019 ची तयारी सुरू केली आहे. 

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार ज्या ज्या वेळी सत्तेच्या बाहेर असतात त्या त्यावेळी पक्षातील करपलेल्या भाकरी बाजूला करून तरुणांना संधी देण्याचे काम करतात. 1995 व 1999 नंतर आता 2019 साठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे धोरण पक्षाने आखलेले दिसत आहे. विस्कटलेल्या राष्ट्रवादीला कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या माध्यमातून नव्या कार्यकर्त्यांना घेऊन संघटित केले जात आहे. सोलापूर शहरात असलेल्या तीन विधानसभा मतदार संघांपैकी शहर मध्य व सोलापूर उत्तर या मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद निर्णायक आहे. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीची कॉंग्रेससोबत आघाडी झाल्यास उत्तरची जागा मिळू शकते अशी शक्‍यता गृहीत धरून राष्ट्रवादीने जोमाने तयारी सुरू केली आहे. 

या मतदार संघातून मनोहर सपाटे, महेश गादेकर यांनी नशीब अजमावले आहे. आता येथून 2019 साठी संतोष पवार यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. हल्लाबोल आंदोलनासाठी सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच ग्रामदैवत सिद्धेश्‍वर, शहाजहूर दर्गा, मार्कंडेय मंदिर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिविहाराचे दर्शन घेतले. अजित पवारांची ही दर्शनवारी बेरजेच्या राजकारणाचा एक भाग मानला जात आहे. 

महापालिकेत सत्ता नाही, अवघे चार नगरसेवक, सत्तेच्या काळात शहर राष्ट्रवादीकडे झालेले दुर्लक्ष अशा विचित्र स्थितीत सोलापूर शहरातील हल्लाबोल आंदोलन यशस्वी करण्याचे मोठे आव्हान शहराध्यक्ष भारत जाधव व कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्यापुढे होते. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शहराध्यक्ष जाधव व कार्याध्यक्ष पवार यांनी हे आंदोलन यशस्वी करून दाखविले आहे. या यशस्वी हल्लाबोलचा मोठा फायदा कार्याध्यक्ष पवार यांना राजकीय कारकिर्दीत होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com