solankar resigns from rsp | Sarkarnama

रासपचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सोलनकर यांचा राजीनामा

मिलिंद संगई
सोमवार, 15 एप्रिल 2019

बारामती शहर : राष्ट्रीय समाज पक्षाचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बापूराव सोलनकर यांनी पदाचा राजीनामा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडे दिला आहे. 

पक्षामध्ये अनेक पदाधिकारी काम न करता केवळ कुरघोड्या करतात, अनेक चांगल्या पदाधिकाऱ्यांना पक्षातून बाहेर घालवले, महादेव जानकर या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, असे नमूद करत सोलंकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

रासपमध्ये माझ्यासाहित अनेक कार्यकर्त्यांची घुसमट होते आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. रासपचे बापूराव सोलनकर यांनी बारामती लोकसभा मतदार संघात दुष्काळी दौरे, पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी मेहनत घेतली होती. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात राजीनामा हा रासपला मोठा धक्का आहे.  सोलनकर म्हणाले, ""अनेक पदाधिकारी पक्ष वाढवण्याऐवजी पक्षाला संपवण्याचे काम करीत आहेत. दरम्यान कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ.''  

संबंधित लेख