SOCIAL WELFARE OFFICER SUSPENDED | Sarkarnama

वेतन मंजुरीप्रकरणी  समाज कल्याण अधिकारी छाया गाडेकर निलंबित 

सरकारनामा न्यूज ब्यूरो
शुक्रवार, 9 मार्च 2018

मुंबई : लातूर जिल्ह्यातील निलंगा इथल्या चंद्रसागर बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या तीन शाळा बंद असताना तेथील शिक्षकांना दोन कोटी दोन लाख इतके वेतन मंजूर केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हा समाज कल्याण अधिकारी छाया गाडेकर यांना निलंबित करण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.

या संपूर्ण प्रकरणाचा लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून एका महिन्यात अहवाल मागवून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

भाजपचे सदस्य गिरीश व्यास, नागोराव गणार यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. गतिमंद मुलांसाठी उदगीर इथल्या विद्याभूषण युवक मंडळाच्या तीन शाळा 2011 ते 2013 या कालावधीत बंद केल्या होत्या.

त्यानंतर मंडळाने या शाळा चालविण्यासाठी चंद्रसागर बहुद्देशीय संस्थेकडे हस्तांतरित केल्या. मात्र, जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी शाळा बंद असतानाही शिक्षकांचे वेतन मंजूर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिक्षकांच्या बॅंक खात्यात पगाराची रक्कम जमा केल्याचे मंत्री बडोले यांनी सांगितले.

संबंधित लेख