Social Welfare department officers Trimbak Treck | Sarkarnama

समाज कल्याणचे शंभर अधिकारी करणार ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचे 'ट्रेकींग' 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्याचा. मात्र, नाशिकमध्ये त्याला धार्मिक कारणाने मिळणारी ट्रेकींगची जोड आहे. अगदी प्रशासनाचे अधिकारीही अलिप्त नाहीत. गेली सहा वर्षे येथील समाज कल्याण विभाग त्यात आवर्जून सहभागी होतो.

नाशिक : श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्याचा. मात्र, नाशिकमध्ये त्याला धार्मिक कारणाने मिळणारी ट्रेकींगची जोड आहे. अगदी प्रशासनाचे अधिकारीही अलिप्त नाहीत. गेली सहा वर्षे येथील समाज कल्याण विभाग त्यात आवर्जून सहभागी होतो. यंदा शंभर महिला व अधिकारी त्र्यंबकेश्‍वरला ब्रम्हगिरीला प्रदक्षिणेसाठी 'ट्रेकींग' करणार आहेत. 2012 पासून समाज कल्याण विभाग हा उपक्रम करतो आहे. 

समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल हे समाज कल्याण विभागात कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा म्हणुन पंढरपूरची वारी, नाशिक शहर, परिसरातील पर्वतराजीमध्ये शनिवार, रविवारी ट्रेकींग आयोजित करत होते. त्यात कळसूबाई शिखरावर सात वेळा, गिरणार पर्वतावर ट्रेकींगचे उपक्रम केले आहेत. समविचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेला 'एव्हरग्रीन' हा व्हॉटस्‌ऍप ग्रुप स्थापन केला आहे. त्या माध्यमातून विविध उपक्रम केले जातात. पहिल्या प्रदक्षिणेला अवघे वीस अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले होते. त्यात वाढ होऊन आता शंभर सहकारी सहभागी होतात. रविवारी (ता. 19) पहाटे चारला कुशावर्तात स्नान करून त्र्यंबकेश्‍वराच्या दर्शनानंतर दोन गटांत प्रदक्षिणेला सुरूवात होईल. 

संबंधित लेख