social media vita sangli | Sarkarnama

 सोशल मीडियावर निकालाआधीच 'गुलालाची' उधळण 

प्रताप मेटकरी 
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

विटा : खानापूर तालुक्‍यातील 45 ग्रामपंचायतींच्या निवडणूका या चुरशीच्या आणि लक्षवेधी लढती होत आहेत. सरपंच पदाची निवड ही थेट जनतेतून प्रथमच मतदानाव्दारे होणार आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर निकालाआधीच 'गुलालाची' मुक्त उधळण करत विजयाचे दावे - प्रतिदावे करत "गुलाल आपलाच" असा नारा केला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर इलेक्‍शन फिव्हर' "गुलालमय" झाल्याचे चित्र आहे. 

तालुक्‍यातील 45 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी 122 तर सदस्य पदासाठी 766 असे एकूण 888 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात आपले राजकीय नशीब आजमावत आहेत. उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी गावोगावी वॉर्डनिहाय मतदार आणि कार्यकर्त्याच्या भेटीगाठी आणि बैठका घेऊन जोरदार प्रचार मोहीम राबवली आहे. आता प्रत्यक्ष प्रचाराचा धुरळा थांबला असला तरी छुप्या प्रचाराला सुरवात झाली आहे. आजचा आणि उद्याचा दिवस महत्वाचा असल्यामुळे यंत्रणा 'सैराट' होऊन कामाला लागली आहे. 

सोशल मीडिया हे एक जनसंपर्काचे प्रभावी माध्यम आहे. फेसबुक, व्हॉटसऍपचा वापर करणाऱ्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भेटीगाठीबरोबरच फेसबुक आणि व्हॉटसऍपच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. आपल्या गटाचा संबधित उमेदवार कसा योग्य आणि सक्षम आहे हे विविध स्लोगन, कॅचलाईनच्या माध्यमातून पटवून सांगितले जात आहे. 

सरपंच पदासाठी 45 गावांत प्रतिष्ठेच्या आणि तुल्यबळ लढती होत असल्यामुळे सोशल मीडियाचे नेटवर्क हाताळणारे दोन्ही गटाचे कार्यकर्ते सोशल मीडियावर प्रचारासाठी 'सैराट' झाले आहेत. मतदान आणि निकाल जाहीर होण्यापूर्वीच आपल्या नेत्यांच्या आणि उमेदवारांच्या छायाचित्रासह विजयाच्या राजकीय पोस्ट टाकून गुलाल आपलाच असा दावा करत निवडणूकीत चुरशीचे रंग भरु लागले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ग्रामपंचायत निवडणूकीचा 'इलेक्‍शन फिव्हर' "गुलालमय" झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीचे फटाके फुटण्यास सुरवात झाली आहे.  
 
संबंधित लेख