snehalata kolhe mla | Sarkarnama

आजचा वाढदिवस : स्नेहलता बिपीन कोल्हे : आमदार भाजप, कोपरगाव विधानसभा मतदार संघ (जि. अहमदनगर)

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

आमदार स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी यापूर्वी संजीवनी मिल्कचे अध्यक्षपद भूषविले. दूध उत्पादकांना चांगला दर, शेतकऱ्यांना दुग्ध उद्योगासाठी कर्ज अशी विविध कामे त्यांनी केली. कोपरगाव बचत गटाच्या चळवळीची प्रमुख धुरा त्यांनी सांभाळली. साधारणतः दोन हजार बचत गटांचे त्यांनी नेतृत्त्व केले आहे. महिलांच्या बचत गटातील उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे, महिला सक्षमीकरण अशा विविध विषयांवर त्यांनी विशेष काम केले. आमदार झाल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. पुणतांबे येथील शेतकरी संपाच्या दरम्यान त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

संबंधित लेख