skhilrdh yadhav support federal front | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

अखिलेश यांच्याकडून "फेडरल फ्रंट'चे समर्थन 

वृत्तसंस्था
बुधवार, 26 डिसेंबर 2018

लखनौ : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची जमवाजमव सुरू केली असताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यांनी मात्र आज तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या "फेडरल फ्रंट'चे समर्थन केले आहे. अखिलेश यांच्या या भूमिकेमुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 

दरम्यान, उद्या (ता.27) रोजी अखिलेश हे के. चंद्रशेखर राव यांची भेट घेणार होते; पण काही अपरिहार्य कारणांमुळे ही भेट शक्‍य नसल्याचे अखिलेश यांच्याकडून सांगण्यात आले. पुढे हैदराबादला गेल्यानंतर आपण चंद्रशेखर राव यांची भेट घेऊ असे त्यांनी नमूद केले. 

दरम्यान, मध्य प्रदेशात समाजवादी पक्षाच्या निवडून आलेल्या एकाही उमेदवारास मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याने अखिलेश हे कॉंग्रेसवर नाराज असल्याचे समजते. यावरून टीका करताना ते म्हणाले की, ""भाजपसोबत कॉंग्रेसचेही आभार. मध्य प्रदेशात आमच्या एकमेव आमदारालादेखील मंत्री करण्यात आले नाही. अशा स्थितीत आमचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपला हटविण्यासाठी महाआघाडी स्थापन करावीच लागेल. यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे.'' 

संबंधित लेख