Sixty dams are dry | Sarkarnama

राज्यातील धरणांत दहा टक्के साठा,साठ धरणे कोरडी 

संपत देवगिरे : सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 3 जून 2017

ज्यातील धरणे - 3,248, 
प्रकल्पांची क्षमता- 48,416 द.ल.घ.मी., 
आजचा साठा- 3,880 द.ल.घ.मी., 
सरासरी (2017)- 9.56 टक्के, 
सरासरी (2016)- 7.79 टक्के. 

नाशिक  : राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांत यंदा गतवर्षीच्या दुष्काळी स्थितीच्या तुलनेत अधिक साठा आहे. धरणांत 9.56 टक्के साठा असून जुलैअखेर सिंचन व पिण्याच्या पाण्याची चिंता मिटल्याने प्रशासन आणि नागरी प्रशासन निश्‍चिंत आहे.

दोन वर्षांपूर्वी दुष्काळी स्थिती असल्याने या धरणांतील साठ्याने तळ गाठला होता. त्यादृ÷टीने राज्यातील बहुतांश पाणी योजना वोमठ्या शहरांत यंदा पिण्याच्या पाण्याची स्थिती उत्तम असल्याने यंदा सगळ्यांनाच पाण्याच्या राजकारणाचा विसर पडला आहे. . 

राज्यात 35,466 दशलक्ष घनमीटर प्रकल्पीय साठा असलेले 138 मोठे, 6,063 दशलक्ष घनमीटर प्रकल्पीय साठा असलेले 255 मध्यम आणि 6,887 दशलक्ष घनमीटर प्रकल्पीय साठा असलेले 2,855 लघु पाटबंधारे प्रकल्प असून त्यांची क्षमता 48,416 दशलक्ष घनमीटर आहे. त्यात दोन दिवसांपूर्वी 3880 दशलक्ष घनमीटर असा 9.56 टक्के साठा आहे.

अमरावती विभागात 452 , नागपूरला 384, नाशिक विभागात 556, पुणे विभागात 725 तर मराठवाड्यात 956 प्रकल्प आहेत. त्यातील बहुतांश महत्वाच्या प्रकल्पांत पाण्याचा साठा आहे. सामन्यतः पिण्याच्या पाण्याचे नियोजन व आरक्षण टाकतांना 31 जुलै अखेर पावसाचा अंदाज गृहीत धरुन नियोजन केले जाते. यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यातच राज्याच्या विविध भागात पावसाटचे आगमन झाले आहे. त्यादृष्टीनि पिण्याच्या पाण्याबाबत प्रशासन निश्‍चिंत आहे. 

साठ धरणे कोरडी 
राज्यातील साठ प्रकल्पांत सध्या काहीही साठा नाही. यामध्ये काटेपूर्णा (अकोला), खडकपूर्णा (बुलढाणा), अरुणावती (यवतमाळ), चोंडे निम्न (ठाणे), गोसीखुर्द, राजीवसागर (भंडारा), कालीसरार (गोंदिया), नांद (नागपूर), निम्न वर्धा (वर्धा), निळवंडे-2, मुळा (नगर), वाघूर, उर्ध्व तापी- हतनूर (जळगाव), गिरणा, चणकापूर, तिसगाव, पुणेगाव, पालखेड, भावली, मुकणे, वैतरणा (नाशिक), तिल्लारी, दुधगंगा (कोल्हापूर), घोड, टेमघर, पवना, पानशेत, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, वरसगाव (पुणे), धोम बलकवडी, वीर (सातारा), भीमा (सोलापुर), सिना कोळेगाव, सोनगिरी (उस्मानाबाद) यांसह साठ मध्यम प्रकल्पांत सध्या शून्य प्रकल्पीय साठा आहे. त्यामुळे ही धरमे कोरडी पडली आहेत. त्यांचा समावेश अन्य समुहांत केला जातो. जुलैच्या पहिल्या आठवड्यात या धरणांच्या साठ्यात वाढ होण्यास सुरवात होईल. 

जलविद्युत निर्मिती ठप्प 
राज्यातील विविध खासगी धरणांतील पाण्याचा वापर जलविद्युत तसेच मुंबई शहराला पिण्याच्या पाण्यासाठी होतो. यामध्ये टाटा समुहाच्या कुंडली, लोनावळा, मुळशी आणि ठोकरवाडी यांसह मध्य वैतरणा, मोडकसागर आणि तानसा,या धरणांत काहीही साठा नाही. त्यामुळे जलविद्युत निर्मीतीवर त्याचा परिणाम झाला आहे. मुंबई शहराला पामीपुरवठा करणाऱ्या वाळवण (32.44 टक्के), शिरवता- टाटा (14.97 टक्के) आणि बरवी (33.94 टक्के), भातसा (36.25 टक्के), अप्पर घाटघर (44.49 टक्के) जलसाठा असल्याने मुंबई, ठाणे व लगतच्या शहरांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा सुरळीत आहे. 

संबंधित लेख